काही लोकांना प्रेतावर राजकारण करण्याची सवय; फडणवीसांचा निशाणा

काही लोकांना प्रेतावर राजकारण करण्याची सवय; फडणवीसांचा निशाणा

खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 15 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे.
Published on

मुंबई : खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 15 श्री सदस्यांना उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर काही जणांवर उपचार सुरु आहेत. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काही लोकांना प्रेतावर राजकारण करण्याची सवय; फडणवीसांचा निशाणा
...तेव्हाच उध्दव ठाकरेंसोबत माझे ट्युनिंग संपले; फडणवीसांचा खुलासा

खारघर घटना ही दुर्दैवी आहे. नियोजन करताना इतक्या उन्हाच्या झळा असतील असे वाटले नव्हते. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे म्हणणे होते आमच्या लोकांना दिवसा कार्यक्रमाची सवय आहे. तो कार्यक्रम नीट पार पडला असता तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

उष्माघातामुळे हा प्रश्न निर्माण झाला. यामधून आपल्याला काही शिकायला मिळाले. पुढील काळात नियोजन करताना ध्यानात ठेवावी लागेल. ही घटना दुर्दैवाने घडली. काही लोकांना प्रेतावर राजकारण करण्याची सवय आहे ती बंद झाली पाहिजे, अशी जोरदार टीकाही फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राजकारणासाठी हा पुरस्कार दिला, अशी टीका विरोधकांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती. याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. नानासाहेब धर्माधिकारी यांना काँग्रेस व राष्ट्रवादी काळातही कार्यक्रम झाला. तेव्हाही गर्दी होती. तेव्हा राजकारणासाठी हा पुरस्कार दिला का? ही दुटप्पी भूमिका आहे, असाही पलटवार त्यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com