बेईनामी झाली, परंतु आपण गनिमी कावा केला आणि सरकार पुन्हा आणलं; फडणवीसांची जाहीर कबुली?

बेईनामी झाली, परंतु आपण गनिमी कावा केला आणि सरकार पुन्हा आणलं; फडणवीसांची जाहीर कबुली?

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला फडणवीसांची फूस होती, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता.
Published on

नागपूर : आपल्यासोबत बेईनामी झाली, परंतु आपण सुद्धा शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आपण गनिमी कावा केला आणि आपलं सरकार पुन्हा आणलं, शिंदे-फडणवीस एका विचाराचे सरकार सत्तेत आले, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीला फडणवीसांची फूस होती, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात होता. अशातच, फडणवीसांच्या आजच्या विधानाने ही जाहीर कबुली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बेईनामी झाली, परंतु आपण गनिमी कावा केला आणि सरकार पुन्हा आणलं; फडणवीसांची जाहीर कबुली?
शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला! संजय शिरसाट, बच्चू कडूंचा समावेश?

मी मुख्यमंत्री होतो पण पालकमंत्री नव्हतो, त्यामुळं पालकमंत्री पदाचा अनुभव नव्हता. बावनकुळे हे सर्वात इफेक्टिव्ह पालकमंत्री होते. त्यामुळं मी त्यांना म्हटलं की तुम्ही मला पालकमंत्री पदाच्या कामाचा या अनुभव द्या मी तुम्हाला प्रदेशाध्यक्ष पदाच्या कामाचा अनुभव सांगतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे. भाजप नागपूरात मजबूत आहे. मात्र निवडणुकीच्या वेळी काहीतरी तोटका होतो आणि आपण पराभूत होतो, असा निशाणा त्यांनी विरोधकांवर साधला आहे. एकत्रित आणि आत्मविश्वासाने जिंकलो तर 12 पैकी 12 जागा आपण जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात 9 वर्ष पूर्ण झाले, दहा वर्षात अतिगरिबी 1 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. पुढील पाच वर्षात आपला देश खूप पुढे जाणार आहे. 2024 मध्ये मोदी जी एवढ्या ताकतीने पुढे येणार आहे की भाजपला कुणीच हरवू शकणार नाही. आपल्यासोबत बेईनामी झाली, आपण सुद्धा शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आपण गनिमीकावा केला आणि आपलं सरकार पुन्हा आणलं, शिंदे फडणवीस एका विचाराचे सरकार सत्तेत आले, असेही त्यांनी सांगतिले.

शेतकऱ्यांना 24 तास वीज देत आहोत, महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सुट दिलीय. ओबीसींसाठी नमो आवास योजना आणली. भाजपचे कार्यकर्ते म्हणून बैठका कराच पण सामान्य जनता आणि सरकार यांच्यात सेतू म्हणून काम करा, हे कराल तर जनतेशी मैत्री होईल. नुसतं जिंदाबाद, मुर्दाबाद करून चलणार नाही. चांगल्या कामासाठी आडकाठी केली तर मला सांगा, मी सरळ करतो. मी कधीच कुणाला घाबरत नाही, कॉम्प्रमाईज करत नाही. जे योग्य आहे ते मी करतोच आणि जे अयोग्य असेल तर मी जवळच्या व्यक्तीने सांगितले तरी मी करत नाही. पंतप्रधान मोदी यांनी एवढे काम केले की त्यांच्या पुढे सर्व नेते ठेंगणे झाले, आपल्या कामाची रेषा मोठी करा आपल्या कामाने उत्तर द्या, असा कानमंत्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com