जमिनीमध्ये एकनाथ खडसेंनी तोंड काळ केलं नसतं तर...; फडणवीसांचा घणाघात
जळगाव : शासन आपल्या दारी कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जमिनीमध्ये एकनाथ खडसेंनी तोंड काळ केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती, असा जोरदार टोला देवेंद्र फडणवीसांनी खडसेंना लगावला आहे.
काळे झेंडे दाखवून एकनाथ खडसेंना काय मिळणार आहे? एकनाथ खडसे यांचा असं झालंय की त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालकांनी जसं सांगितलं तसं ते वागतात. जमिनीमध्ये एकनाथ खडसेंनी तोंड काळ केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती. परिवारात राहिले असते नवीन मालकाकडे त्यांना जावं लागलं नसतं, असा जोरदार टोला देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ खडसेंना लगावला आहे. अशा काळा झेंडा घाबरणारे आम्ही नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.
तसेच, विरोधकांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे कार्य आम्ही करून दाखवू असं कोणी बोललं का? विरोधकांनी केलेल्या घोटाळ्यामुळे सर्व विरोधक एकत्र आलेत. त्यांनी केलेले घोटाळे बाहेर निघत आहेत त्याच्यावर कारवाई होत आहे. नरेंद्र मोदी यांचे शासन राहिल्यास ही कारवाई होतच राहील व आपले सांगाडे बाहेर निघतील हे लक्षात आल्याने सर्व विरोधक एकत्र आले. महाराष्ट्राच्या जनतेचा नरेंद्र मोदींवर पूर्ण विश्वास आहे व जनता त्यांच्या पाठीशी आहे, अशी टीकाही फडणवीसांनी विरोधकांच्या बैठकीवर केली आहे.