मी पुन्हा येईन, पण उत्तर प्रदेशमध्ये? गुगल म्हणतयं देवेंद्र फडवीस हे 'युपी'चे उपमुख्यमंत्री

मी पुन्हा येईन, पण उत्तर प्रदेशमध्ये? गुगल म्हणतयं देवेंद्र फडवीस हे 'युपी'चे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात गुगलच पूर्णतः गोंधळलेले दिसत आहे. म्हणूनच की काय देवेंद्र फडणवीस यांच्या नावाखाली चक्क उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.
Published on

मुंबई : शिवसेनेतील बंडामुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदवरुन पायउतार झाले. यानंतर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली व एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. परंतु, सत्तानाट्याच्या या प्रक्रियेत गुगलच पूर्णतः गोंधळलेले दिसत आहे. म्हणूनच की काय देवेंद्र फडणवीस यांच्या नावाखाली चक्क उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.

मी पुन्हा येईन, पण उत्तर प्रदेशमध्ये? गुगल म्हणतयं देवेंद्र फडवीस हे 'युपी'चे उपमुख्यमंत्री
अजबच! योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्रीच शिक्षेची फाईल घेऊन कोर्टमधून पळून गेले

अनेक वेळा गुगल गंडलेले असते, असा आरोप युजर्सकडून केला होता. हाच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राचे नववे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. परंतु, गुगलवर देवेंद्र फडणवीस सर्च केले असता त्यांच्या नावाखाली चक्क उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री असा उल्लेख दिसत आहे. आता यामागे गुगलच्या टेक्निकल का ह्युमन एरर की आणखी काही अशी शंका व्यक्त होत आहे.

दरम्यान, भाजप-शिंदे गट सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर आपण स्वतः मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याची घोषणा फडणवीसांनी केली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. परंतु, वरिष्ठांच्या आग्रहाखातर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. परंतु, अनेक भाजप नेत्यांना हे पचनी पडलेले दिसत नाही. अनेक वेळा त्यांच्या विधानातून हे उघड झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com