devendra fadnavis discussion eknath shinde
devendra fadnavis discussion eknath shindeteam lokshahi

शिंदेंच्या बंडात फडणवीसांची एंट्री, व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झाली चर्चा

नवी माहिती समोर, मविआचा खेळ खल्लास?
Published by :
Shubham Tate
Published on

devendra fadnavis discussion eknath shinde : एकनाथ शिंदेच्या गटात आता आणखी एक नाव सामील झाले आहे. शिवसेनेच्या उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत हेही नॉट रिचेबल असल्याचे समजत आहे. यामुळे सामतांनीही बंडखोरी केल्याची चर्चा आहे. यामुळे शिंदे गटाचे बळ आता वाढणार आहे. तर दुसरीकडे विलीनीकरण हा पर्यया शिंदे (eknath shinde) गटासमोर उपलब्ध आहे. आधीच्या कायद्यात गट बनवणे शक्य होतं. मात्र आत्ताच्या कायद्यात हे शक्य नाही. हे निलंबनापासून विलीनीकरणाशिवाय वाचू शकत नाहीत. (devendra fadnavis had a discussion eknath shinde)

devendra fadnavis discussion eknath shinde
1 जुलैपासून बदलणार 'हे' 5 मोठे नियम, थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल

तर दुसरीकडे या बंडाशी भाजपचा कोणताही संबंध नाही, असं वारंवार सांगितलं जात आहे. पण, आता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी बंडखोर आमदारांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मात्र, आता गुवाहाटीमध्ये मुक्कामी असलेल्या बंडखोर आमदारांशी देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

आमदारांना विश्वास देण्यासाठी फडणवीस बोलल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. शनिवारी रात्री जवळपास 15 आमदार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे फडणवीस यांच्याशी बोलले, असल्याचे समोर आले आहे.

devendra fadnavis discussion eknath shinde
BIS Recruitment 2022 : पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी

तर दुसरीकडे पक्षातील बंडखोरीविरोधात आज शिवसेनेने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. मुंबईसह पालघर, पुणे, नाशिक, नागपूर आदी ठिकाणीदेखील बंडखोरीविरोधात आंदोलन झाले आहे. तर, दुसरीकडे शिवसेना नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी मुंबईत मेळावे घेतले आहेत. या मेळाव्यात बंडखोरांवर निशाणा साधण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com