Devendra Fadnavis
Devendra FadnavisTeam Lokshahi

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत हलविणार? फडणवीसांनी दिले उत्तर

मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सांगत विरोधकांनी शिंदे-फडणवीसांनी आज सभागृहात घेरले.
Published on

मुंबई : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत स्थलांतरित करण्यात येणार असल्याचे सांगत विरोधकांनी शिंदे-फडणवीसांनी आज सभागृहात घेरले. यावरुन राज्य सरकारवर जोरदार टीकाही विरोधकांकडून करण्यात आली होती. यावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात खुलासा केला आहे. संपूर्ण आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला हे चुकीचे आहे, असा खुलासा त्यांनी केला आहे.

Devendra Fadnavis
सभागृहात आदित्य ठाकरेंच्या लग्नाची चर्चा; फडणवीस म्हणाले, आम्ही जबाबदारी घेऊ

देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय दिल्लीला हलवण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही. केवळ वस्त्रोद्योग आयुक्त आणि ५ अधिकाऱ्यांना दिल्लीला येण्यास सांगितले आहे. वस्त्रोद्योग मंत्रालयाची फेरबांधणी आणि या क्षेत्राला अधिक चालना देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. या आयुक्तालयात ५०० अधिकारी-कर्मचारी असून संपूर्ण आयुक्तालय दिल्लीत हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, हे चुकीचे आहे, असे स्पष्टीकरण फडणवीसांनी दिले आहे.

दरम्यान, वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत नेण्यावरुन कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी सरकारवर निशाणा साधला होता. महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते केंद्राला मदत करतात, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com