विरोधकांना गजनीची लागण झालीय; देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : अजित पवार यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते या भूमिकेतून आज विरोधकांची बाजू पत्रकार परिषदेत मांडली. यावेळी बोलताना अजित पवार यांनी राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर टीका केली. तसेच, त्यांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेताना अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित शासकीय चहापानावर विरोधक बहिष्कार टाकत असल्याचं अजित पवारांनी जाहीर केलं. यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्ष या नात्याने तीनही पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेत असल्याची टीका यावेळी फडणवीसांनी केली. (Devendra Fadnavis criticizes opposition parties)
दरम्यान, पुढे बोलताना ते म्हणाले की, विरोधकांना गजनीची लागण कुठेतरी झालीय. तसेच विरोधकांना आमच्यावर जास्त विश्वास आहे. आमच्यापेक्षा त्यांनी स्वत:च्या एकजुटीसाठी प्रयत्न करावेत. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसेच मागच्या सरकारने नऊ-नऊ महिने शेतकऱ्यांना मदत केली नाही. आमच्या सरकारने तात्काळ निर्णय घेतले आहेत. 95 % पंचनामे झाले आहेत, केवळ 5% बाकी आहेत. तेथील स्थानिक नेत्यांनी यात अडथळा निर्माण केला, त्यांनी तक्रार केली आहे की, याठिकाणी पंचणामे व्यवस्थित झाले नाहीत, त्यामुळे त्यात सुधारणा करून लवकरचं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
वेगवेगळ्या प्रकारचे जे काही निर्णय घेतले आहेत, त्यात कुठेही स्थगिती दिली नाही आम्ही त्याच पुनरावलोकन करतोय. कारण जाता जाता या सरकारने जिथे 100 रुपयांची तरतुद आहे, तिथे त्यांनी 500 रुपये वाटून टाकले आहेत. त्यामुळे त्याच पुनरावलोकन करावं लागेल. यासाठी हा निर्णय घेतला असल्याच त्यांनी स्पष्ट केलं.