उद्याच सत्ता स्थापनेचा दावा? देवेंद्र फडणवीस शिंदेंचा 1 जुलैला शपथविधी?
devendra fadnavis eknath shinde : महाराष्ट्रात सत्तापालट होणार, हे स्पष्ट झालं आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक कायदेशीर पेचही सुटल्यात जमा आहे. राज्यपालांनी सरकारला वेळ न देता एका दिवसात अधिवेशन घेण्याचा आदेश दिला आहे. तसेच बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. याविरोधात सेनेचे वकील पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले. मात्र सेनेला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिल्याने अखेर ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी घटनेच्या नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप होत आहे. मात्र, महाराष्ट्रातील सत्तापालटामागे राज्यपालांची भूमिका महत्वाची होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना आता सरकार स्थापन करता येणार आहे. (devendra fadnavis and eknath shinde sworn in july 1)
त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा 1 जुलै रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे. फडणवीस आणि शिंदे उद्याच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील असंही बोललं जात आहे. एकनाथ शिंदे गट अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी भाजप, प्रहार, मनसे आदी पक्षांमध्ये विलिन होऊ शकतो. अस ही राजकीय जाणकार मत मांडत आहेत.
सरकारबरोबर फक्त राजकीय आणि सामाजिक संघर्ष नव्हता. वैयक्तिक संघर्षही होता. आमच्यावर खोट्या केसेस टाकणं, कुटुंबीयांवर हल्ले करणं या सगळ्या गोष्टींचा निकाल लागला आहे. अडीच वर्षांत महाराष्ट्राला कुठपर्यंत नेलं याची चर्चा होत नाही, पण बदल्याचं जे राजकारण केलं, त्याचा अंत आजच्या निमित्ताने झाला आहे. अशी प्रतीक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.