J.P. Nadda : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे

J.P. Nadda : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व्हावे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मत व्यक्त केले आहे.
Published on

मुंबई : भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदी घोषणा केली आहे. मात्र, या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस सहभागी होणार नसल्याची घोषणा केली आहे. यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सांभाळावी, असे मत व्यक्त केले आहे.

जे. पी. नड्डा म्हणाले की, महाराष्ट्राच्या विषयावर भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे राज्याचे पुढील मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सरकारमधून बाहेर राहण्याची घोषणाही केली आहे. भाजपचे संपूर्ण समर्थन एकनाथ शिंदेंना मिळेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले, हे आमच्या पक्षाच्या नेता आणि कार्यकर्त्यांचे चरित्र दर्शवतो. आणि आम्हाला कोणत्याही पदाची लालसा नाही. आम्ही एका विचारासाठी एकत्र आलो आहोत. आणि विचारांना पुढे घेऊन जाणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

तसेच, महाराष्ट्र जनतेचा विकासासाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला आहे. फडणवीसांना सरकारमध्ये सक्रिय होऊन पदभार सांभाळावा, अशी माझी व्यक्तीगत आणि पक्षाची इच्छा आहे. तर, देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीच्या रुपाने पदभार सांभाळावा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आशा पूर्ण कराव्या, असे निर्देश पक्षाने दिले आहेत, असेही नड्डा यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com