दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चला अटक करण्यात आली. सहा दिवसांच्या ईडी कोठडीनंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. आता अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली असून 1 एप्रिलपर्यंत म्हणजेच आणखी 4 दिवस ईडी कोठडीत राहणार आहेत.
केजरीवाल यांना न्यायालयाने 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांची कोठडी आज संपणार होती. त्यावर ईडीने त्यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू येथील विशेष न्यायालयात हजर केले.
दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिल्याने ईडीच्या पथकाने केजरीवाल यांच्या घरी छापा टाकला होता. केजरीवाल यांना मागील वर्षापासून आतापर्यंत चौकशीसाठी दहावेळा समन्स बजावण्यात आले होते. परंतु, केजरीवाल यांनी समन्सला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे ईडीने कारवाईचा बडगा उगारत त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.