ठाकरे गटाला धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार?

ठाकरे गटाला धक्का! दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचा सेलिब्रिटी चेहरा दीपाली सय्यद सध्या फारशा सक्रिय दिसत नाहीत. अशातच आता दीपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत.
Published on

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचा सेलिब्रिटी चेहरा दीपाली सय्यद सध्या फारशा सक्रिय दिसत नाहीत. अशातच आता दीपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरु झाल्या आहेत. यावर त्यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. मी सध्या वेट अँड वॉच'च्या भूमिकेत असल्याचे सूचक विधान दीपाली सय्यद यांनी केले आहे. यामुळे ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुषमा अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर सक्रिय का नाही, असा प्रश्न विचारला असता दीपाली सय्यद म्हणाल्या की, सुषमा अंधारे यांनी आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना त्यांचे अस्तित्व सिध्द करायचे आहे. मला आता शिवसेनेत साडेतीन वर्ष झाली आहेत. त्यामुळे मला गरजेचं नाही की, स्क्रिनवर प्रत्येक वेळी येऊन टीका टिप्पणी करावी आणि टीका-टीप्पणी केल्यावरच तुम्ही राजकारणात सक्रिय असता, असं म्हणणं चुकीचं आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, ते कधी एकत्र येतील माहित नाही. दसरा मेळाव्याला मी इथे नव्हते कारण मी पुण्यात होते. मात्र मला असं वाटलं की, दोन्ही माणसं आपलीच आहेत. कारण मला असं वाटत होतं दोन्ही गट एकत्र यावं. प्रत्येकाचा सध्या आपापले गट तयार झाले आहेत. लवकरच माझाही गट दिसेल. काम करताना एक फॉर्म डिसिजन असणं गरजेचं आहे, असे सूचक वक्तव्य दीपाली सय्यद यांनी केले आहे.

तुम्ही सध्या उद्धव ठाकरे सोबतच आहात ना? असं विचारल्यावर दिपाली सय्यद यांनी मी सध्या वेट अँड वॉच भूमिकेत असून जो काय निर्णय घेईन, तो मी लवकरच कळवेन, असे म्हंटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात दीपाली सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com