Deepali Sayed : अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेला गृहमंत्री
मुंबई : शिंदे सरकारच्या (Shinde Government) मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता सुरू आहे. त्यात नेमकं कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी गृहमंत्री पद दिल्यास सत्तेत सहभागी होऊ, असे मोठे विधान केले. यावरुन आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी मनसेवर निशाणा साधला आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या की, मनचे म्हणजे एका आमदाराची अगरबत्ती, अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडून घरी बसलेला गृहमंत्री. शॅडो कॅबिनेटने अयोध्याला जाता येत नसते रे भोंगामंत्री. तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा सरंक्षण मंत्री, अशी टीका त्यांनी केली आहे.
तसेच, माननीय लोक पहिले बोलतात मोदीजींबद्दल, नंतर करतात पवार साहेबांच्या मनासारखे, वेळ येईल तशी पलटी मारतात, हे संपुर्ण अयोध्यालाच नाही तर देशाला माहीत आहे. माननीय राजसाहेबांनी आजारी असल्याने आराम करावे आदरणीय उद्धव साहेब लवकरच तुम्हाला भेटायला येतील सतत आठवण काढु नये, असा सल्लाही दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
दरम्यान, अंबरनाथ बदलापूर त्यानंतर उल्हासनगरमध्ये अमित ठाकरे यांचा महासंपर्क दौऱ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पत्रकांनी तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का, असे अमित ठाकरे यांना विचारले असता त्यांनी मला मंत्रीपद नको ती अफवा आहे. मात्र, आम्हाला जर गृहमंत्री पद मिळाले तर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, असे सूतोवाच केले आहे. यावरून राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर, राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनाला मुलाखत देताना शिवसेनेच्या आजच्या परिस्थितीला उध्दव ठाकरेंच जबाबदार असल्याचे म्हंटले होते.