ग्रामपंचायत निवडणुकीत दीपक केसरकरांना मोठा धक्का

ग्रामपंचायत निवडणुकीत दीपक केसरकरांना मोठा धक्का

राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
Published on

सिंधुदुर्ग : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. अशातच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी अपडेट समोर येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत दीपक केसरकरांना मोठा धक्का
कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना धक्का; राम शिंदेंचं वर्चस्व कायम

दीपक केसरकर यांच्या मतदारसंघातील एकही ग्रामपंचायतीवर शिंदे गटाला विजय मिळवता आलेला नाही. केसरकरांच्या विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग तालुक्यातील ३ ग्रामपंचायतीपैकी एका जागेवर भाजप विजयी झाला आहे. तर २ जागा ग्रामविकास आघाडीला मिळाल्या आहेत.

तर वेंगुर्ले तालुक्यात ४ जागांपैकी ३ भाजप तर एक जागेवर ठाकरे गटाने विजय मिळवला आहे. सावंतवाडी मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही. यामुळे हे निकाल दीपक केसरकर यांना हा मोठा धक्का बसल्याचे मानण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com