शिंदेंना शिवसेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर समर्थक आमदार आक्रमक, केसरकर म्हणाले…

शिंदेंना शिवसेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर समर्थक आमदार आक्रमक, केसरकर म्हणाले…

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर शिंदे गटाचे समर्थक आमदार चांगलेच आक्रमक झालेत.
Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर शिंदे गटाचे समर्थक आमदार चांगलेच आक्रमक झालेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून काल हकालपट्टी केली होती. त्यानंतर शिंदे गट याला प्रत्युत्तर देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेले ५० आमदार सध्या गोव्यामध्ये आहेत. हे आमदार उद्या मुंबईत येणार आहेत. त्याआधी या गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली आहे.

शिंदेंना शिवसेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर समर्थक आमदार आक्रमक, केसरकर म्हणाले…
Ajit Pawar Corona Positive : अजित पवारांना पुन्हा कोरोनाची लागण तरीही बहुमत चाचणीला उपस्थित राहणार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आता राज्याचे प्रमुख आहेत, याची आठवण केसरकर (Deepak Kesarkar) यांनी करुन दिली. तसंच एकनाथ शिंदेंना नेतेपदावरुन काढून टाकणार शिवसेनेने (Shivsena) जाहीर केलेलं पत्र हे आक्षेपार्ह आहे. त्याला आव्हान दिलं जाईल, असंही केसरकरांनी सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदेंवर शिवसेनेने केलेल्या कारवाईच्या विरोधात कायदेशीर पाऊल आपण उचलणार असून शिवसेनेला रितसर उत्तर पाठवणार आहोत. अशा तऱ्हेची कृत्ये लोकशाहीसाठी शोभादायक नाही.

शिंदेंना शिवसेनेनं पक्षनेतेपदावरून हटवल्यानंतर समर्थक आमदार आक्रमक, केसरकर म्हणाले…
विधानसभा अध्यक्ष : भाजपकडून नार्वेकर, तर मविआकडून साळवींना उमेदवारी

शिवसेनेकडून कार्यकर्त्यांचं प्रतिज्ञापत्र तयार करुन घेतलं जात असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, अनेक कार्यकर्त्यांकडून अँफिडेव्हिट करण्याची मोहिम चाललीये. पण तशी पद्धत नाही, हे कोणतंही बंधन नाही, प्रेमाचं बंधन लागतं. आजही आमच्या हातात शिवबंधन आहे. बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) निशाणी म्हणून आम्ही ते बांधलं आहे. अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र तयार करणं हे दिशाभूल करण्याचं काम आहे. कार्यकर्त्यावर गैरविश्वास दाखवणं हे चुकीचं आहे. अॅफिडेव्हिट केल्यानं बंधन येत नाही, शिवबंधन हे नातं अजूनही कायम आहे आणि ते अबाधित राहील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com