भिडे गुरुजी आणि भाजपचा संबंध जोडणे चुकीचे; केसरकरांचे विरोधकांना उत्तर

भिडे गुरुजी आणि भाजपचा संबंध जोडणे चुकीचे; केसरकरांचे विरोधकांना उत्तर

संभाजी भिडेंच्या वादग्रस्त विधानावरुन विरोधक आक्रमक झाले असून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. यावरुन विरोधकांनी भाजपला घेरले आहे. याला आता दीपक केसरकरांनी उत्तर दिले आहे. भिडे गुरुजी हे स्वतंत्र आहेत. भिडे गुरुजी आणि भाजपचा संबंध जोडणे चुकीचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

भिडे गुरुजी आणि भाजपचा संबंध जोडणे चुकीचे; केसरकरांचे विरोधकांना उत्तर
संभाजी भिडेंना अटक करून महाराष्ट्रासह देशातून तडीपार करा; यशोमती ठाकूर आक्रमक

संभाजी भिडे गुरुजी हे स्वतंत्र आहेत. भिडे गुरुजी आणि भाजपचा संबंध जोडणे चुकीचे आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे. मला जास्त माहिती नाही, पण, गृह खात लक्ष देते आहे. गृह खाते तपासून सगळा निर्णय होतो, असे त्यांनी सांगितले.

तर, विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरुनही दीपक केसरकर यांनी मविआवर निशाणा साधाला आहे. विरोधी पक्ष जास्त असल्याने निर्णय घेता येत नाही, त्यांच्यात एकमत होत नाही. राष्ट्रीय विरोधी पक्ष नाहीत. खासदार निवडून आणू शकत नसल्याने राष्ट्रीय दर्जा गेला आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांच्या विधानाविरोधात विरोधक आक्रमक झाले असून त्यांच्या अटकेची मागणी करत आहेत. यावरुन यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारचं भिडेंना पाठीशी घालत आहे. संभाजी भिडे यांना अटक करून गुन्हे दाखल करा. संभाजी भिडे यांना अटक करून त्यांना महाराष्ट्रसह देशातून तडीपार करा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com