फडणवीस नाराज? कोल्हापूरचा दौरा रद्द; दीपक केसरकरांची माहिती

फडणवीस नाराज? कोल्हापूरचा दौरा रद्द; दीपक केसरकरांची माहिती

एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंतीचा दावा करण्यात आला आहे.
Published on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंतीचा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीनंतर विरोधकांकडून शिंदे-फडणवीसांवर सडकून टीका करण्यात येत आहे. तर, यामुळे देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशात, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी फडणवीसांचा कोल्हापूर दौरा रद्द केल्याची माहिती दिली आहे. यामुळे नाराजींच्या चर्चांना उधाण आले आहे.

फडणवीस नाराज? कोल्हापूरचा दौरा रद्द; दीपक केसरकरांची माहिती
दिल्ली-एनसीआर ते जम्मू-काश्मीरपर्यंत भूकंपाचे तीव्र धक्के, पाकिस्तानमध्येही प्रभाव

काय म्हणाले दीपक केसरकर?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानाचा पडदा दुखावल्यामुळे त्यांनी विमान प्रवास टाळावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. परिणामी जनता आपल्या दारी या उपक्रमांतर्गत कोल्हापूरला जाणाऱ्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. तर, आज वर्तमान पत्रात जाहिरात आल्यामुळे फडणवीस नाराज असल्याची चर्चांमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा दीपक केसरकर यांनी केला आहे.

आज आलेल्या जाहिरातीमध्ये जर काही त्रुटी असतील तर त्याचा खुलासा उद्या छापण्यात येऊ शकतो. युतीमध्ये कुठलाही बेबनाव नाही. आजच्या जाहिराती संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलणं झालं आहे. प्रवीण दरेकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी ही चर्चा केली जाईल. युती अभ्यासून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ही जोडी जनतेसाठी गतिमानतेने काम करत आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

काय आहे जाहिरात?

सगळ्या वृत्तपत्रात पहिल्या पानावर जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीची मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना सर्वाधिक पसंतीचा दावा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिंदेंना 26.1%पसंती देण्यात आली आहे तर फडणवीसांना 23.2% पसंतीचा दावा करण्यात आला आहे. यासोबतच राज्यातील 49.3% जनतेनं शिंदे-फडणवीसांना पसंती दर्शवल्याचा दावा केला आहे. मतदानासाठी भाजपला 30.2%, शिवसेनेला 16.2% जनतेनं कौल दिल्याचे सांगण्यात आले आहे. तर भाजप-शिवसेना युतीला पुन्हा सत्तेवर आण्यासाठी 46.4% जनता इच्छुक असल्याची माहिती या जाहिरातीतून मिळत आहे. तसेच, पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांचा एकत्र फोटो छापण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com