महायुतीत पडणार मिठाचा खडा? अजित पवारांच्या 'त्या' जागेवर दावा, केसरकरांची सूचक प्रतिक्रिया

महायुतीत पडणार मिठाचा खडा? अजित पवारांच्या 'त्या' जागेवर दावा, केसरकरांची सूचक प्रतिक्रिया

अजित पवार यांनी महायुतीत लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याचे कर्जतमधील निर्धार सभेत जाहीर केले. अशातच, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published on

मुंबई : अजित पवार यांनी महायुतीत लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याचे कर्जतमधील निर्धार सभेत जाहीर केले. यात शिरूर लोकसभेवरून महायुतीमध्येच रस्सीखेच सुरू होणार असं दिसतंय. अशातच, शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. यावरुन आता महायुतीत मिठाचा खडा पडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

महायुतीत पडणार मिठाचा खडा? अजित पवारांच्या 'त्या' जागेवर दावा, केसरकरांची सूचक प्रतिक्रिया
मी राजीनामा देतो म्हणालो याचे कारण...; अजित पवारांच्या आरोपांवर शरद पवारांचे प्रत्युत्तर

दीपक केसरकर म्हणाले की, आमचा प्रयत्न आहे की पंतप्रधान मोदींना पुन्हा निवडून आणणे. अजित पवारांनी सांगितलं की ते ४ जागांवर लढतील, काही ठिकाणी आम्ही त्यांना मदत करु. पण, याचा अर्थ असा नाही की आम्ही आमच्या जागा सोडू किंवा भाजपा आपल्या जागा सोडेन, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तर, अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांवरही केसरकरांनी भाष्य केले आहे. हा विषय राष्ट्रवादीचा आहे. मला शरद पवार यांचा आदर आहे. पण, अजित दादा हे त्यांचे अनुभव सांगत असतील. साहेबांच्या सांगण्याशिवाय दादा असं करु शकत नाहीत. हे सगळ्यांना माहिती आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

तसेच, भाजपासोबत जायचं हे वरिष्ठांनी सांगितलं होतं पण आता ते मान्य करत नाहीत. महाविकास आघाडीत असताना आपण हिंदुत्वापासून लांब गेलो, बाळासाहेबांचे विचार सोडले, आपण पुन्हा एकदा भाजपासोबत जायला हवं, असं वरिष्ठांनी सांगितल होत. आता ते मान्य करायला तयार नाहीत, असाही निशाणा केसरकरांनी ठाकरे गटावर साधला आहे.

दरम्यान, अजित पवार यांनी महायुतीत लोकसभेच्या चार जागा लढवणार असल्याचे जाहीर केले. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणारच आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com