Deepak Kesarkar : संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या नाही, तर पवारांच्या जवळचे

Deepak Kesarkar : संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या नाही, तर पवारांच्या जवळचे

दीपक केसकर यांचे संजय राऊतांवर टीकास्त्र
Published on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्री पदाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यानिमित्त बंडखोर आमदार दीपक केसकर यांनी शिंदेंना शुभेच्छा दिल्या. यावेळी केसकरांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच, वेळीच सावध व्हा, लोक दूर जात आहेत, असाही सल्ला केसकरांनी दिला आहे.

दीपक केसरकर म्हणाले, देवाचा आशीर्वाद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री दालन आता सर्वसामान्य लोकांसाठी खुले झाले आहे. आज तो अनुभव आम्हाला अनेक वर्षांनंतर आला. रिक्षावाला म्हणून मुख्यमंत्र्यांना हिणवल गेलं. पण, आता रिक्षावाल्यांसाठी स्टॅण्ड तयार करणार आहोत, असा निशाणा त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर साधला आहे.

राज्यच गत वैभव परत येईल. आजचा दिवस राजकारणाकडे पलीकडे जाऊन आनंद व्यक्त करण्याचा दिवस आहे. यापूर्वी अनेक मुख्यमंत्री राहिले. तेव्हा देखील वर्षावर प्रवेश होता. बाळासाहेब हे राज्याचे दैवत आहेत. ते सर्वांचे आहेत आणि राहणार, असेही केसकरांनी सांगितले आहे.

संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या किती जवळचे आहेत ते माहित नाही. पण, ते पवारांच्या जवळचे आहेत, अशी टीकाही दीपक केसकरांनी केली आहे. पक्ष धोक्यात आला, हे कळल्यावर माझे प्रयत्न सुरू झाले. तेव्हा मी आमच्या नेत्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, असेही त्यांनी सांगितले. आधी जखम करायची, मग मलम लावायचे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. वेळीच सावध व्हा, लोक दूर जात आहेत, असाही सल्ला केसकरांनी दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com