आम्ही गद्दार तर मग तुम्ही...; दीपक केसरकरांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
मुंबई : शिंदे सरकारचे पहिलेच अधिवेशन सुरु असून विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. विधानसभेच्या आंदोलनात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गद्दार गद्दार अशा घोषणा दिल्या. यावर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे. ज्या 50 लोकांनी बंड केले. त्यांचा मला अभिमान आहे. जनतेनी भाजप आणि सेनेला निवडून दिलं होतं. जर आम्ही गद्दार तर मग तुम्ही जनतेला फसवले आहे. त्यांचं काय, असा निशाणा त्यांनी साधला आहे. त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधाला.
दीपक केसरकर म्हणाले की, एक काल हिटलर लोकप्रिय होता. आज ज्यांना शिवाजी महाराजांच्या नाव घेण्याचा अधिकार नाही. ते शिवसंपर्क अभियान घेत आहेत. छत्रपती यांच्या नावाचा आदर केला जातो आणि त्यांच्याकडून करारनामा घेतला गेला. युवराजांकडून एक करार पत्र लिहून घेण्यात आला. त्यांच्या नावासाठी राजकारण करण्याची गरज नाही. आपण शाहू महाराजांच नाव घेतो. त्यांच्या नावाचा गैरवापर करत आहात. तुम्हाला शिवसंपर्क घ्यायचा अधिकार नाही आणि महाराजांचा नाव घेण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली आहे.
उदय सामंत यांनाही विचारा. जर राज्याच्या भूमीशी असं करणार असाल तर तुम्ही जो शब्द वापरता तो कोणाबदल वापरला पाहिजे. याचा विचार केला पाहिजे. आम्ही छत्रपतींच्या गादीशी नतमस्तक होतो. बाळासाहेबांनी अख्ख महाराष्ट्र जागरूक केलं. तुम्ही जनतेचा तुम्ही अपमान करत आहात. राज्याच्या जनतेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मत दिलं नव्हते. बाळासाहेब यांनी कधीही ही इच्छा बोलून दाखवली नाही, असे देखील त्यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री आणि त्यांची मुलं कधीही मंत्री झालेले नाहीत हे पहिल्यांदा घडलं. राज्यात असं कधीही घडलेलं नव्हते. एकाच घरात मुख्यमंत्री आणि मंत्री होते. मुलं राजकारणात येतात ही परंपरा असू शकते. राज्यात स्वतःची एक परंपरा आहेत आणि ती परंपरा कोणी तोडलेली नाही, असेही टीकास्त्र त्यांनी शिवसेनेवर सोडले आहे.
आजपर्यंत मी बोलत नव्हतो. ज्या नरेंद्र मोदींनी हिंदुत्ववाचा जागर केला. त्यांच्याशी तुम्ही काय केलं? बंद खोलीत तुम्ही मोदीजींशी काय चर्चा केली? भाजपशी तुम्ही बोलणं टाळलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले. त्या 50 लोकांचा मला अभिमान आहे ज्यांनी बंड केला. जनतेनी भाजप आणि सेनेला निवडून दिलं होतं. जर आम्ही गद्दार तर मग तुम्ही जनतेला फसवले आहे. त्यांचं काय, असा सवालही दीपक केसरकर यांनी विचारला आहे.
ते पुढे म्हणाले, तुमच्या सोबत 10 ते 15 जण उरलेली आहेत. एखादा मनुष्य शिवसेनेत वाढू नये. त्यासाठी तुम्ही प्रयन्त केला असता तर महापालिकेत भाजपची सत्ता आली असती.
मराठी माणसाचा स्वाभिमान कसा ठेवायचा याचा त्यांनी विचार केला. बंद खोलीत चर्चा केली तेव्हा काय आश्वासन दिली तर मग ती बाहेर येऊन का तोडली? आमचे मुख्यमंत्री दिवसभर काम करतात. त्यांच्यावर तुम्ही टीका करतात. उद्या किंवा परवा मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बोलणार आहे, असेही केसरकरांनी सांगितले.