अजित पवारांच्या विधानावर केसरकरांचे भाष्य; म्हणाले, नाव आम्ही ठेवलं...
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान काल हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले होते. त्या विधानावरून सध्या प्रचंड वादंग निर्माण झाले आहे. या विधानावर आक्रमक प्रतिक्रिया येत असताना त्याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर?
धर्मवीर हे नाव आम्ही ठेवलं नाही. धर्मासाठी संभाजी महाराज यांनी आहुती दिली. धर्मांतर केलं असतं तर त्यांचे प्राण वाचले असते. पण, हाल होऊनसुद्धा ते झुकले नाहीत. धर्मासाठी त्यांनी बलिदान केलं. ते स्वराज्यरक्षक आहेतच. पण, धर्मवीरही आहेत. स्वराज्यरक्षक संभाजी महाराज आहेत. असं शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले.
काय म्हणाले होते अजित पवार?
महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेला खतपाणई घातलं जात नाही. बाल शौर्य पुस्कार हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी कधीच धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पण काहीजण जाणीवपूर्वक धर्मवीर उल्लेख करतात. मी मंत्रिमंडळात असतानाही त्यावेळी स्पष्ट सांगितलं होतं, संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, असे अजित पवार कल म्हणाले होते.