राजकारण
मोठी बातमी! आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी
कॉंग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. कॉंग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणाची गोरंट्याल यांनी दखल घेतली असून ते वर्सोवा पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार करणार आहेत. अज्ञात इसमाकडून गोरंट्याल यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समजते आहे. अज्ञात व्यक्तीने दुपारी त्यांना फोन करून धमकी दिल्याचंही कळते आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.