आव्हाडांवर झालेल्या विनयभंगाचा गुन्हावर अमृता फडणवीस म्हणाल्या, हे महाविकास आघाडी सरकार...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या आज नाशिक दौऱ्यावर होत्या. पिंग अँड ब्ल्यू स्कूलचे उद्घाटन सोहळ्यानिमित्त त्या नाशिक येथे आल्या होत्या. या उद्घाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबद्दल भाष्य केले आहे. राज्यात आता आधीसारखं गुंडाराज राहिला नाही. सुसंस्कृतपणे तक्रार केली पाहिजे. आपण गुंडागर्दी करू शकत नाही. अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्यात आता आधीसारखं गुंडाराज राहिलेले नाही, राज्यात आता आधीसारखं गुंडाराज राहिला नाही. सुसंस्कृतपणे तक्रार केली पाहिजे. आपण गुंडागर्दी करू शकत नाही.त्यामुळे कुठलंही आंदोलन करताना डेकोरम पाळणं आवश्यक आहे. अशा शब्दात अमृता फडणवीसांनी राष्ट्रवादीला टोला लगावलाय.
जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यनंतर राष्ट्रवादीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. त्यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, तिथल्या अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करावी, पण गुंडागर्दी करु नये, विनयभंगाची गोष्ट संबंधित महिलेला चांगलं माहिती आहे. याबाबत संबंधित महिलेला विचारावं लागेल. त्या महिलेनं गुन्हा का दाखल केला. इथं बसून त्या महिलेबाबत बोलू शकत नाही, हे महाविकास आघाडी सरकार नाही. त्यामुळं खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत. असे अमृता फडणवीस यावेळी बोलताना म्हणाल्या.