राऊतांच्या 'त्या' आरोपावर फडणवीसांची टीका; म्हणाले, निर्बुद्ध लोकांना...
नुकताच निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिले. आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय वातावरण चांगेलच तापले आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात आता वाद आणखीच तीव्र झाला आहे. यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे शिंदे गट आणि भाजपविरुद्ध प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसत आहे. या निर्णयावरून संजय राऊत यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर गंभीर आरोप केला होता. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. असा आरोप त्यांनी केला होता. त्यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
संजय राऊत यांच्या आरोपावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारणात माणूस कधी वर जातो, कधी खाली जातो. परंतु, निराश होऊन, मनात येईल ते बोलल्यामुळे लोक त्यांच्या बुद्धीची कीव येते. त्यांच्या बोलण्याने काही होत नाही. मात्र लोकांना वाटते, की आपण ज्यांना मोठे नेते म्हटले तेच नेते संजय राऊतांसारखं निर्बुद्धपणे बोलतात. त्यामुळे अशा निर्बुद्ध लोकांना मी काय उत्तर देऊ, अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीका केली आहे.
काय केले होते संजय राऊत यांनी आरोप?
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना संजय राऊत यांनी एक ट्विट करत शिंदे गटावर आणि भाजपवर मोठा आरोप केला आहे. चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत. माझी खात्रीची माहिती आहे. हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे, असा मोठा दावा त्यांनी केला आहे. बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.