कर्नाटकातील भाजपचा पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, जवळपास ते देशच जिंकले...
संपूर्ण देशाचे लक्ष आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आहे. या निवडणुकीत आतापर्यंत हाती आलेल्या निकाला नंतर राज्यात काँग्रेसचं वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. कर्नाटक निवडणुकीत 224 जागांपैकी काँग्रेसला जवळपास 133 जागांवर आघाडी घेत काँग्रेसने कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर भाजपला फक्त 67 जागा मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले पराभवानंतर देवेंद्र फडणवीस?
माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ' कर्नाटकात कोणतेच सरकार परत येत नाही. एखादा दुसरा अपवाद सोडलं तर ते बदलत असते. यावेळी आम्ही कल तोडू शकेल, असे वाटते होते. पण, तसे झाले नाही. 2018 साली भाजपाच्या 106 जागा निवडून येत 36 टक्के मत मिळाले होती. आता भाजपाला 35.6 टक्के मते मिळाली आहेत. म्हणजे 0.4 टक्के मते भाजपाची कमी झाली आहेत. अशी आकडेवारी फडणवीसांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, 'काही लोकांना असं वाटत आहे, जवळपास ते देशच जिंकले आहेत. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. आज उत्तर प्रदेश मधल्या लोकल बोर्डाचा निकाल लागला. यामध्ये भाजपचा एकतर्फी विजय झालाय. जो उत्तर प्रदेश जिंकतो, तो देश जिंकतो. असे ते म्हणाले. आजच उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल समोर आले आहेत. याठिकाणी भाजपाची एकहाती सत्ता आली आहे. त्यामुळे कर्नाटकाचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचं सांगत आहेत, त्यात कोणताही अर्थ नाही. असा निशाणा त्यांनी विरोधकांवर साधला. त्यानंतर विरोधकांच्या जल्लोषावर बोलताना फडणवीस म्हणाले की, काही लोक बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवावा अशी काही लोकांची स्थिती आहे. या लोकांनी आयुष्यभर दुसऱ्यांच्या घरी मुल झाले तर आनंद साजरा केला.