या देशात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं योग्य नाही; का म्हणाले देवेंद्र फडणवीस?
राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच दुसरीकडे आपल्या वक्तव्याने चर्चेत असणारे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी महात्मा फुले यांचा मारेकरी असलेल्या नथुराम गोडसेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला होता. त्यानंतर त्यांच्या या कृतीचा सर्वच स्थरावरून विरोध केला गेला. ही घडना संपत नाही तर गुणरत्न सदावर्ते यांच्या एका मोर्च्यात पुन्हा एकदा नथुराम गोडसेचे फोटो झळकल्याचे दिसून आले. यावरच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
एसटी कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीसाठीचे मतदान नुकताच पार पडलं. त्यानंतर आज या निवडणुकीची मतमोजणी झाली. मात्र, मतमोजणी दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते हे कार्यकर्त्यांसह त्याठिकाणी आले. परंतु, यावेळी सदावर्तेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये नथुराम गोडसेच्या नावानेही घोषणा देण्यात आल्या. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'ती एसटी कर्मचाऱ्यांची बँक आहे. त्याची निवडणूक झाली आहे. तिथे हा निवडून येतो किंवा तो निवडून येतो, याच्याशी आमचे काहीही देणे घेणे नाही. पण एवढं मात्र नक्की आहे की, या देशात नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणं योग्य नाही. या देशात महात्मा गांधींचाच विचार चालेल. गोडसेचा विचार चालू शकत नाही. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली.