'सामना'तून मनसेसह केंद्र सरकारवर घणाघाती टीका
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ह्यांनी हिंदूत्ववादी भूमिका स्वीकारत राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर सुरू झालेला शिवसेना-मनसे संघर्ष (Shivsena Vs MNS) थांबण्याचं नाव घेत नाहीये. शिवसेनेसह महाविकास आघाडीतील (MVA Goverment) अनेक नेत्यांकडून मनसेवर टीका केली जात आहे तर मनसे नेत्यांसह राज्यातील भाजप नेतेदेखील (BJP Leaders) राज ठाकरेंच्या बाजूने वक्तव्य करताना पाहायला मिळत आहेत.
'पोरखेळांनी आणि प्रायोजित कार्यक्रमांनी कोणाला हिंदूंचे सम्राट वगैरे होता येणार नाही. महाराष्ट्रात दोन ओवेसी एकत्र येऊन भाजपचा छुपा अजेंडा पुढे रेटीत आहेत आणि केंद्राचे सरकार हा सर्व प्रकार मूक दर्शक बनून पाहत आहे. चांगल्या राज्यकर्त्यांचे हे लक्षण नाही. देशी राज्यकर्त्यांना राज्य करण्यासाठी इंग्रजांच्या नीतीचा अवलंब करावा लागत असेल तर स्वातंत्र्याचा संग्राम आणि बलिदाने वायाच गेली'. अशी घणाघाती टीका सामना ह्या वृत्तत्रातून करण्यात आली आहे.