Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavTeam Lokshahi

भास्कर जाधवांना जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

जामीन अर्जावरती आज सुनावनी होऊन आमदार भास्कर जाधव यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे.
Published by :
Vikrant Shinde
Published on

निसार शेख, चिपळूण

कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांचे विरुद्ध दि १८ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व गुहागर मतदार संघाचे आमदार श्री भास्कर जाधव यांनी उपस्थित जनसमूदायास संबोधित करताना भारतीय जनता पार्टीचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला बाधा होईल व त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन होईल आशा रितिने अर्वाच्य भाषेत तसेच भारतीय जनता पार्टी व महाविकास आघाडीचे घटक पक्ष यांचे कार्यकर्ते यांच्या मध्ये तेढ व संघर्ष निर्माण होईल असे भाषण केले आशा प्रकारचा गुन्हा रजि नं ०१७७/२०२२ दि १८/१०/२०२२ रोजी भा.द.वी कलम १५३, ५०५(१)(क), ५००, ५०४ अन्वये कुडाळ पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आला होता.

Bhaskar Jadhav
चिपळूण पेठमाप मधील एका महिलेचा खून

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी अटकपूर्व जामीन मिळण्याकरता सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.सदरच्या जामीन अर्जावरती आज सुनावनी होऊन आमदार भास्कर जाधव यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मंत्री व गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव यांचे वतिने सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये चिपळूणचे सुप्रसिद्ध वकील अँड नितिन केळकर, अँड ऋषिकेश थरवळ यांनी काम पाहिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com