राजकारण
सावित्रीबाई फुलेंबद्दल वादग्रस्त लिखाण, फडणवीस म्हणतात, भर रस्त्यात फाशी...
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एका बेवसाइटने आक्षेपार्ह लिखाण केले होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल एका बेवसाइटने आक्षेपार्ह लिखाण केले होते. यावरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. यावर आता विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे.
यावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ज्याने हे लिहिलं आहे त्या आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला रस्त्यावरुन फिरवलं पाहिजे. इतकं वाईट त्यात लिहिलं आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुमचं तर मत आहे मुसक्या आवळून फिरवलं पाहिजे आमचं मत आहे की, अशांना भर रस्त्यात फाशी दिली पाहिजे. पण मतानं होत नाही. आपल्याला कायद्याचं पालन करावं लागते. या व्यक्तीची ओळख शोधली जाईल आणि त्याच्या मुसक्याच बांधल्या जातील. असं फडणवीस म्हणाले.