पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, पाणी काय आकाशातून टाकू का?..
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री शिंदे गटाचे आमदार गुलाबराब पाटील हे कायम वेगवेगळ्या विधानाने चर्चेत असतात. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर मंत्री गुलाबराव पाटील जास्त चर्चेत येत आहे. आता पुन्हा ते वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा चर्चेत आले आहे. पाणी टंचाईवर बोलत असताना गुलाबराव पाटील यांनी खळबळजनक विधान केले आहे. मंत्री पाटील यांच्या या विधानांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
धरणगाव एरंडोल तालुक्यांमध्ये पाणीपुरवठा होत नसल्यानं लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. नदीला आलेल्या पुरामुळे पंप बंद झाले आहेत. यामुळे पंपामध्ये मोठा गाळ जमा झाला आहे.पुरामुळे ही तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यावर पंपच बंद आहेत मग पाणी काय आकाशातून टाकू का?असे वादग्रस्त विधान पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटल यांनी यावेळी केले आहे.
मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचे आहे. राज्यात अनेक पाणी पुरवठा योजना आणणार आहे. खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्या जातील. असे विधान मंत्री पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र, आजच्या विधानांवर पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात आहे.