नाना पटोलेंचे राज ठाकरेंना आवाहन; म्हणाले, खरे देशप्रेमी असाल तर...
राज्यात सध्या काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु आहे. मात्र, या यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. मनसे आणि भाजपने या विधानावरून राहुल गांधींना चांगलेच घेरले होते. त्यावरूनच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सवाल केले आहे. खरे देशप्रेमी असाल तर सावरकरांच्या ज्या पत्रावरून वाद होतोय, त्यावर बसून एकदा चर्चा करा, पत्राचं उत्तर द्या, असं आवाहन पटोले यांनी भाजप आणि राज ठाकरे यांना दिले आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने संविधान आणि तिरंग्याला वाचवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली आहे. संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरले पाहिजे हा संदेश महाराष्ट्रातून देशात गेल्याचं नाना पटोले म्हणाले. त्यामुळे भारत जोडो यात्रेता परिणाम म्हणून महाराष्ट्रात परिवर्तन नक्कीच होणार. तसे वारेही वाहू लागले आहे. येथे लोक पैसे दऊन आणलेले नाहीत, असं स्पष्टीकरण नाना पटोलेंनी दिलं.
60 रुपये महिना त्यांना पेंशन मिळत होती. आता इंग्रज कुणाला पेंशन देतील? स्वातंत्र्यवीराला तर देणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं वैचारिक चर्चा करा, असं आवाहन नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले म्हणाले, ‘ सावरकरांबद्दल आम्ही कोणतेही अपशब्द वापरलेले नाहीत. हे पत्र इंग्रजांना लिहिलेलं होतं. मी तुमच्याकडे नोकर म्हणून काम करायला तयार आहे, अशा आशयाचं ते पत्र आहे. एकदा नाही अनेकदा लिहिलं आहे. असे ते यावेळी म्हणाले