राजकारण
देशभरातील काँग्रेस नेते हैदराबादमध्ये एकत्र येणार; कारण काय?
आजपासून दोन दिवस देशताली काँग्रेसचे नेते हैदराबादमध्ये असणार आहेत.
आजपासून दोन दिवस काँग्रेसचे नेते हैदराबादमध्ये असणार आहेत. कॉंग्रेस कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक हैदराबादमध्ये पार पडणार आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांनी गेल्या महिन्यातच काँग्रेस कार्यकारिणीच्या नव्या टीमची घोषणा केली होती.
या बैठकीत तेलंगणासह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. आज होणाऱ्या या बैठकीला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह माजी अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधीही उपस्थित राहणार आहेत.
ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रसचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली आज हैदराबाद मध्ये कॉंग्रेस कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक होणार आहे.