21 व्या शतकातले कौरव हाफ पँट घालतात, राहुल गांधींचा संघावर निशाणा
काँग्रेसची सध्या संपूर्ण भारतात भारत जोडो यात्रा सुरु आहे. त्या यात्रेचा नेतृत्व राहुल गांधी हे करत आहे. त्यामुळे ते प्रचंड चर्चेत येत आहेत. नागरिकांचा देखील या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सध्या ही भारत जोडो यात्रा हरियाणात आहे. त्यावेळी आजच्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
२१ व्या शतकातले कौरव कोण आहेत तुम्हाला माहित आहेत का? २१ व्या शतकातले कौरव हाफ पँट घालतात आणि शाखेत उपस्थिती लावतात. त्यांच्या हातात लाठी असते. त्यांच्या बाजूने देशातले दोन ते तीन अब्जाधीश या कौरवांच्या बाजूने आहेत. असं म्हणत राहुल गांधी यांनी संघावर टीका केली आहे.
पुढे ते म्हणाले की, संघाच्या लोकांची घोषणा तुम्ही ऐका ते कधीही हर हर महादेव म्हणत नाहीत. कारण भगवान शंकर हे तपस्वी होते. मात्र हे लोक भारताच्या तपस्येवर हल्ला करत आहेत. त्यांनी जय सीताराम या घोषणेतून सीता मातेला एकदम शिताफीने वगळलं. त्यांनी जय श्रीराम ची घोषणा देऊन दहशत पसरवली. हे लोक भारताच्या संस्कृतीच्या विरोधात काम करत आहेत. असे विधान देखील त्यांनी यावेळी केले आहे.