उमेदवार बदलला ही माहिती माध्यमातून कळली, तांबेंच्या उमदेवारीवर पटोलेंचे भाष्य
राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील पाच जागांसाठी निवडणूका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. त्यातच मात्र, नाशिकच्या जागेबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने विद्यमान आमदार सत्यजीत तांबे यांच्याऐवजी त्यांचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात मोठा वाद निर्माण झाला. त्याबाबतच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नाना पटोले यांनी म्हटले की, पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवार बदलाबाबत आपल्यासोबत कोणतीही चर्चा झाली नाही. असे मोठे विधान पटोले यांनी यावेळी केले. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारात अचानक बदल का करण्यात आला, याची आपल्याला कोणतीही माहिती नाही. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती घेऊन भाष्य करण्यात येईल, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
सत्यजीत तांबे हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी काय करायचे हे त्यांनीच ठरवावे. उमेदवारी दाखल न करण्याचा निर्णय घेताना विधीमंडळाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत चर्चा झाली असे समजते. त्यामुळे नेमका हा निर्णय का घ्यावा लागला, त्याची कारणे काय, याबद्दल चर्चा करणार. परंतु, नाशिकमध्ये उमेदवार बदलण्यात आला. ही माहिती माध्यमातून कळली असल्याचे असे देखील त्यांनी सांगितले.