मिलिंद देवरा यांनी दिला कॉंग्रेसचा राजीनामा; ५५ वर्षांचे संबंध संपवतोय

मिलिंद देवरा यांनी दिला कॉंग्रेसचा राजीनामा; ५५ वर्षांचे संबंध संपवतोय

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील वाद समोर आला आहेत. अशातच, आता मिलिंद देवरा काँग्रेसचा राजीनामा दिला आहे.
Published on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडीमधील वाद समोर आला आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघातून उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता मिलिंद देवरा काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. देवरा शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे.

मिलिंद देवरा यांनी दिला कॉंग्रेसचा राजीनामा; ५५ वर्षांचे संबंध संपवतोय
'या' निर्बंधामध्ये राहुल गांधींची मणिपूरमधून सुरु होणार भारत जोडो न्याय यात्रा

मविआमध्ये दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गट सोडण्यास तयार नव्हता. यामुळे काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यानंतर मिलिंद देवरा यांनी कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

मिलिंद देवरा यांनी म्हणाले की, आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. माझ्या कुटुंबाचे पक्षाशी असलेले ५५ वर्षांचे नाते संपुष्टात आणले. सर्व नेत्यांचा, सहकाऱ्यांचा मी ऋणी आहे, असे त्यांनी ट्विटमधून सांगितले आहे. मिलिंद देवरा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत वर्षा निवासस्थानी दुपारी बारा वाजता पक्षप्रवेश करणार आहेत.

दरम्यान, मिलिंद देवरा शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं समजत आहे. अशातच, आता दक्षिण मुंबईच्या जागेवरून शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईच्या जागेसाठी भाजप आग्रही असतानाच मिलिंद देवरा शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com