एकीकडे शेतकऱ्यांचा भारत बंद, दुसरीकडे पंतप्रधान परदेशात, नाना पटोलेंची जोरदार टीका

एकीकडे शेतकऱ्यांचा भारत बंद, दुसरीकडे पंतप्रधान परदेशात, नाना पटोलेंची जोरदार टीका

Published on

राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून शेतकरी संघटनांनी आज भारतबंदची हाक दिली. तर, दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात गेले असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कृषी कायद्यांविरोधात चार महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत, पण मोदी सरकार आपला ताठरपणा सोडायला तयार नाहीत. या आंदोलनात आतापर्यंत 300पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तरी कायदे मागे घेण्यात आले नाहीत. हा अहंकार आहे, अशी टीका त्यांनी केली.

हुकूमशाही वृत्तीच्या या सरकारने हे आंदोलन चिरडून टाकण्याचे प्रयत्न केले. दहशतवादी, नक्षलवादी, देशद्रोही संबोधून शेतकरी आंदोलनाला बदनाम केले. तर दुसरीकडे, ज्यांना शेतीमधील काहीच माहिती नाही, अशा रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्यासारख्या मंत्र्यांना मोदी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पुढे करत आहेत. ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com