Congress : हॉटेलचे बिल देण्यासाठी काँग्रेसने चक्क एफडीच मोडली?

Congress : हॉटेलचे बिल देण्यासाठी काँग्रेसने चक्क एफडीच मोडली?

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

स्वप्निल जाधव, मुंबई

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होती, या बैठकीसाठी मुंबईत काँग्रेसचे सर्व आमदार दाखल झाले होते. या बैठकीत आता मोठी माहिती मिळत आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक बोलावली होती.

या बैठकीत आमदारांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्नेहभोजनाचे बिल देण्यासाठी काँग्रेसकडून एफडी मोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांनी हात आखडता घेतल्यामुळे पक्षाच्या तिजोरीत खडखडाट पडलं असल्याचे बोलले जात आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नेते नाराज आहेत यामुळे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी पक्ष निधी देण्यात हात आखडता घेतला आहे. मात्र काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने या एफडी मोडल्याचा बातमीत तथ्य नसल्याचे सांगत याबाबत पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले मांडतील असं म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com