काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा पर्याय दिलेले आहे पण अजून उत्तर आलेले नाही- बाळासाहेब आंबेडकर
सूरज दाहाट/अमरावती: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे आज अमरावती दौऱ्यावर आहेत दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला,मी दोन पक्षाला काँग्रेस आणि शिवसेनेला युतीचा पर्याय दिलेले आहे पण अजून उत्तर आलेले नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली, तर आमची जेवढी चादर आहे तेवढं आम्ही हातपाय पसरतो,तेवढ जर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे ते जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही तुमच्या बरोबर येऊ कशाला अशी प्रतिक्रिया बाळासाहेब आंबेडकर यांनी दिली तर शिवसेना नेते अरविंद सावंत माझ्याशिवाय निवडून माझ्याशिवाय निवडून येऊ शकत नाही पण त्यांच्या पक्षाने स्वागत केलं नाही पण त्यांच्या पक्षाने स्वीकारला पाहिजे की आम्ही युती करण्यास तयार आहे असही आंबेडकर यांनी सांगितले.
राज्यातील राजकारण अस्थिर, बाळासाहेब आंबेडकर यांची टीका
राज्यातील राजकारण हे पूर्णपणे अस्थिर आहे सुप्रीम कोर्टाकडून अजून खुलासा झाला नाही, की 16 आमदार अपात्र च्या संदर्भात असून कुठलाही निर्णय झाला नाही, तसेच अध्यक्षांनी निर्णय घेऊ की नाही हेही स्पष्ट झालं नाही त्यामुळे सर्व राजकारण अस्थिर आहे अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी दिली तर राज्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, देवेंद्र फडवणीस यांच्या डोक्यात अद्यापही मुख्यमंत्रीपद आहे, नुकसान भरपाई देऊ असे फडवणीस म्हणाले पण शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही कारण त्यांच्याकडे निधीच उपलब्ध नाही तर शेतकऱ्या निधी देणारा कुठून असा सवाल देखील प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.