कुणीही कुणाच्या बाजूला फोटो काढण्यासाठी जात नाही, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला
राज्यात आज मोठ्या उत्साहात दोन वर्षानंतर गणेश विसर्जन पार पडत आहे. या विसर्जना दरम्यान राजकिय वादविवाद सुरु असताना दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दहीसरमध्ये गणपती दर्शनाला गेले असताना त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका यावेळी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, पावसातही लोकांचा उत्साह दुगणित झाला आहे. मी पुण्यात नागरिकांचं स्वागत स्वीकारण्यासाठी लोकांमध्ये गेलो, तर फोटो काढण्यासाठी गेलो अशी टीका करण्यात आली. पण फोटो काढण्यासाठीपण लोकं जवळ यायला लागतात ना, अशी नाव न घेता असा टोला मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, प्रेमाने लोकांना जवळ घ्यावेही लागते, कुणीही कुणाच्या बाजूला फोटो काढण्यासाठी जात नाही, या सगळ्यांना सद्बुद्धी येवो, अशी प्रार्थना करतो मी गणरायांना करतो, आपण टीका करायची नाही, पण कामातून सर्वाना उत्तर देणार असं मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हंटले.
सरकार बदलले आहे, तर सगळेच बदलायला पाहिजे
दोन वर्षांनंतर गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येतो आहे. येणारे सगळे सण जल्लोषात, उत्साहात, आनंदात साजरे करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे. गेले दोन वर्षे असलेली निगेटिव्हिटीचे वातावरण बदल व्हायला पाहिजे, असेही ते म्हणाले. सरकार बदलले आहे, तर सगळेच बदलायला पाहिजे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदेंनी बोलताना व्यक्त केला.