शिवाजी पार्कवर झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया म्हणाले...

शिवाजी पार्कवर झालेल्या राड्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया म्हणाले...

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी असे प्रकार घडवून आणणे निषेधार्ह
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सामंजस्याची भूमिका घेऊन स्मृती दिनाच्या एक दिवस आधी स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबाना अभिवादन करतो. मात्र त्यांच्या स्मृतीदिनाला गोंधळ घालून गालबोट लावण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमीच असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतीदिनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. खरंतर मुख्यमंत्री असल्यामुळे प्रत्यक्ष स्मृतीदिनी जाऊन अभिवादन केले तरीही आपल्याला कुणी अडवू शकणार नाही. मात्र तरीही तसे करणे आपण टाळले कारण यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये अशीच माझी इच्छा होती.

आजही दरवर्षीप्रमाणे बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी स्मृती स्थळावर जाऊन मी दर्शन घेईपर्यंत तिथे कुणीही आले नव्हते,मात्र मी निघाल्यावर तिथे उबाठा गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब तिथे आले आणि आमच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. तसेच महिला भगिनींबद्दल अपशब्द वापरले. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची ही शिकवण नसून यांच्या स्मृतिदिनी विनाकारण अशांतता निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हा निंदनीय असून त्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे असे मत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com