तुम्ही केलेल्या अभद्र युतीच्या विरोधात आमचा उठाव, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजपासून जळगाव दौऱ्यावर आहेत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. याच दौऱ्या दरम्यान त्यांची आज मुक्ताईनगर येथे जाहीर सभा झाली. यासभेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्षावर प्रहार केला.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
आज जळगाव मध्ये सभेत बोलत असताना मुख्यमंत्री यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बंडखोरीबाबत महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांना घेऊन चालणाऱ्या शिवसेनेत आहोत, भाजप आमच्या युतीवर नेहमी टीका केली जाते. मात्र, भाजप बाळासाहेबांचे विचाराप्रमाणे काम करते त्यात टीका करण्याचे कारण नाही. आम्ही काय सर्व आमदारांना जबरदस्ती नेलं नाही. एवढ्या ५० आमदारांना जबरदस्ती घेऊन जाणं शक्य नाही. तुम्ही केलेल्या अभद्र युतीच्या विरोधात आम्ही सर्वांनी मिळून हा उठाव केला होता. अशी जोरदार टीका त्यांनी महाविकास आघाडीवर व उध्दव ठाकरेंवर यावेळी केली.
गोमुत्र शिंपडणारे तेवढे शिल्लक राहतील
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, जळगावात गुलाबराव पाटलाचे प्रस्थ आहे. मात्र गुलाबराव पाटलांना हिणवले जाते. कुणीही हिणवण्याचे काम करू नये. मी स्वत शेतकऱ्याचा मुलगा आहे, मात्र मुख्यमंत्री झाल्यावर ते चालत नाही. सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री झाले पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला.
शाहजी बापू स्टेजवर आल्यावर लोकांच्या टाळ्या वाजल्या. मुख्यमंत्र्यांनी शाहजी बापूचा फेमस डायलॉग मुख्यमंत्र्यांनी म्हटला. पुढे ते म्हणाले की, दोन वर्षात आम्ही एवढं काम करू की औषधाला सुद्धा कोणी शिल्लक राहिला नही राहणार. फक्त गोमुत्र शिंपडणारे तेवढे शिल्लक राहतील? असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकाला लगावला.
आता फक्त 30 चा आकडा वाढवायचा
भाजप आणि आमचे आमदार आता एकूण १७० एवढं आहे. आता फक्त 30 चा आकडा वाढवायचा आहे, त्यामुळे 200 च्या पुढे गेलो तरी आश्चर्य वाटायला नको, हे ग्रामपंचायत निवडणुकीवरून सिद्ध झाले आहे. असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला.