CM Eknath Shinde
CM Eknath ShindeTeam Lokshahi

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची महत्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, तेच नमूद केलं...

दुर्दैवाने २५ लोकांना वाचवता आलं नाही, ही मोठी दुखद घटना आहे. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात जे काही आवश्यक असेल, ते सर्व केलं जाईल.
Published by :
Sagar Pradhan
Published on

बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर शनिवारी मध्यरात्री खासगी बसचा अपघात झाला. बसचा अपघात झाल्यानंतर बसने ताबडतोब पेट घेतला यावेळी बसमधील 25 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोकाकळा पसरली आहे. या अपघातावर राजकीय प्रतिक्रिया येत देखील येत आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

CM Eknath Shinde
'हा अपघात नव्हे तर मर्डर' बुलढाणा अपघातावर जलील यांची संतप्त प्रतिक्रिया

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'आज सकाळपासूनच आम्ही जिल्हाधिकारी आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर त्याची भीषणता लक्षात येते. रात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. धावती बस खांबाला धडकून डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला, त्यांनतर बसला आग लागली, असं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. रिपोर्टमध्येही तेच नमूद केलं आहे.' अशी माहिती त्यांनी दिली.

पुढे ते म्हणाले की, 'दुर्दैवाने या घटनेत २५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याची संधीच मिळाली नाही. आठ लोक यातून बाहेर निघाले आणि आठजण जखमी झाले आहेत. त्या लोकांवर तात्काळ उपचार करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यांचा जीव वाचला पाहिजे आणि त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. दुर्दैवाने २५ लोकांना वाचवता आलं नाही, ही मोठी दुखद घटना आहे. समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता, भविष्यात जे काही आवश्यक असेल, ते सर्व केलं जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com