प्रकाश सुर्वेंच्या चितावणीखोर वक्तव्याची क्लीप व्हायरल, शिवसेना-शिंदे गटात वाद पेटण्याची चिन्हं
शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी एक चितावणीखोर वक्तव्य केलंलं आहे. आपण गाफील राहायचं नाही. पण यांना यांची जागा दाखवून दिल्याशिवाय अपण गप्प बसायचं नाही. कुणाचीही दादागिरी खपवून घ्यायची नाही. कुणी अरे केलं तर त्याला कारे करा, प्रकाश सुर्वे इथं बसलाय. ठोकून काढा, हात नाही तोडता आला तर तंगडी तोडा, दुसऱ्या दिवशी टेबल जामीन करुन देतो मी, चिंता करु नका. प्रकाश सुर्वे यांच्या या वक्तव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आम्ही कुणाच्या अंगावर जाणार नाही. पण अंगावर आला तर शिंगावर घेऊन कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. हे लक्षात ठेवून राहा’, असं वक्तव्य असलेली आमदार प्रकाश सुर्वे यांची एक क्लिप समोर आली आहे. या विरोधात आता दहिसर पोलीस ठाण्यात ही क्लिप देत शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं सुर्वे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
प्रकाश सुर्वेंच्या चितावणीखोर वक्तव्याची क्लीप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने सुर्वेंन विरोधात या क्लीपच्या आधारे तक्रार दाखल केली आहे. ते शिवसेना आणि शिंदे गटात वाद पेटण्याला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.