नवाब मलिकांना धक्का! समीर वानखेडेंना जात पडताळणी समितीकडून क्लीन चीट
मुंबई : मुंबईतील क्रुझ ड्रग्स प्रकरणाचे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी अनेक आरोप केले होते. समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोपही मलिकांनी केला होता. परंतु, मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने समीर वानखेडे हे मुस्लीम नसल्याचा निर्वाळा दिला आहे.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असून बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. यावरुन नवाब मलिक यांच्यासह अन्य तिघांनी जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. परंतु, आज समीर वानखेडे यांना जातप्रमाणपत्र समितीकडून क्लीनचिट मिळाली आहे. समीर वानखेडे आणि त्यांच्या वडिलांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचे सिद्ध होत नाही, असे समितीने अहवालात म्हंटले आहे. वानखेडेंविरोधातल्या तक्रारी जातपडताळणी प्रमाणपत्र समितीने फेटाळल्या आहेत.