Chitra wagh
Chitra waghTeam Lokshahi

'नांदेड घटनेचं राजकारण करून विरोधकांनी स्वतःच मानसिक आजारपण दाखवलं'

नांदेड प्रकरणावरुन चित्रा वाघ यांचे विरोधकांना खडे बोल
Published by :
Team Lokshahi
Published on

नांदेड : भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नांदेड शासकीय रुग्णालयाला भेट दिली. यानंतर त्यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. या घटनेचं राजकारण करून विरोधकांनी स्वतःच मानसिक आजारपण महाराष्ट्रातील जनतेला दाखवलं, त्याची मला कीव येते, असे म्हणत चित्रा वाघ यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले आहे.

Chitra wagh
ललित पाटीलसाठी दादा भुसेंनी फोन केला होता; अंधारेंचा गंभीर आरोप

खरंतर गेले काही दिवस विरोधक या घटनेवरून जो सूर आळवताहेत त्यांना मला हे सांगायचंय जे इथे येऊन मोठमोठ्या बाता करून गेले ते किंवा अगदी मीही डॉक्टर नाही. पण मागच्या तीन वर्षाचे हॉस्पिटलचा स्टॅटीस्टीक्स चा रिपोर्ट पहा 2020 ते 2023 पर्यंत दरदिवशी १३ असा मृत्यूदर यात दिलेला आहे. त्यामुळे हे एकाच दिवशी घडलेलं नाही, असे चित्रा वाघ यांनी म्हंटले आहे.

महायुतीचं हे सरकार फेसबुकवरचं सरकार नसून ॲक्शन मोडमधलं सरकार आहे, असे म्हणत त्यांनी उध्दव ठाकरेंना टोला मारला आहे. नांदेड घटनेसंदर्भात एका दिवसात १४ निर्णय घेतले गेले. डीपीडीसीचे फंड दिले गेले. त्याच बरोबरीने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सिव्हील सर्जन, हॉस्पिटलचे डीन यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यांच्या तसेच राज्यभरातील सर्व शासकीय हॉस्पिटल्समध्ये जे काही त्रुटी असतील, त्यांचा आढावा घेण्याचं काम सुरू झालं आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

खाजगी रूग्णालयात उपचार घेत असलेले पेशंट अत्यवस्थ परिस्थितीत आणले जातात. डॉक्टर त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करतात. ज्या दिवशी 24 मृत्यू झाले त्यातले 17 अत्यवस्थ परिस्थितीत आणले गेले होते. शिवाय त्याच दिवशी 230 रूग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले होते, असेही चित्रा वाघ यांनी सांगितले.

सरकार सर्वसामान्य जनतेचे आहे, त्यामुळे राज्यात एकही मृत्यू झाला तर ती जबाबदारी सरकारचीच असून त्या अनुषंगाने राज्यसरकार काम करत आहे. राज्यात एकही मृत्यू होणं ही सरकारसाठी दुःखाचीच गोष्ट आहे. पण या घटनेचं राजकारण करून विरोधकांनी स्वतःच मानसिक आजारपण महाराष्ट्रातील जनतेला दाखवलं, त्याची मला कीव येते. असे म्हणत त्यांनी विरोधकांची चांगलीच कानउघडणी केली आहे.

विरोधकांना महाराष्ट्रातील जनतेच्या दु:ख वेदना यांच्याशी काही घेणदेणं नाहीय आहे. नांदेडमध्ये येऊन लोकांच्या दु:खाचा बाजार मांडून स्वत:साठी राजकीय सलाईन हवं होतं, तेच त्यांनी इथं येऊन नेलं त्याचा धिक्कार आहे आणि त्यात राज्याच्या मोठ्ठ्या ताईंचा मोठा सहभाग होता हे अत्यंत दुर्देवी आहे, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे.

विरोधकांच्या संभ्रमी, भयभीत करणाऱ्या गोष्टींवर अजिबात विश्वास ठेवू नये. हे सरकार तुमचं आहे. तुमची गैरसोय होणार नाही, यासाठी कायम कटीबद्ध आहे. असे त्यांनी ट्विट द्वारे सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com