राजकारण
चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट; कलाटे निवडणूक लढवणार ठाम
उद्धव ठाकरेंसह अनेकांचे फोन आले, पण मी चिंचवड पोटनिवडणुकीतून माघार घेणार नाही.
राज्यात विधान परिषद निवडणूकीनंतर आता आता कसबा-पिंपरी चिंडवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीचे चित्र अखेरी स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी माघार घेतला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाजप उमेदवार अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे अशी तिरंगी लढत होणार आहे.
राहुल कलाटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील फोनवरुन संपर्क साधला होता. मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. चिंचवडमध्ये माझा विजय पक्का आहे, असा ठाम विश्वास कलाटे यांनी व्यक्त केला आहे.