मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा लवकरच महाराष्ट्र दौरा
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी दौरे सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर या झालेलं नुकसानीच्या पाहणीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्याचा दौरा करणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दौरा जाहीर झाल्यानंतर शिंदे-फडणवीसांनी एकत्रित दौरा आयोजित केला आहे. महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिंदे-फडणवीसांच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. शनिवारपासून नंदुरबार मधून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
मागील दोन महिन्यात झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. नुकताच उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले होते. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर टीका देखील झाली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होण्याआधीच शिंदे- फडणवीस महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाचे बालेकिल्ले असलेल्या भागात करणार शिंदे- फडणवीस एकत्रित दौरा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचा अयोध्या दौरा?
राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. अशातच आता राज्यातलं सत्तानाट्यनंतर मुख्यमंत्री शिंदे आता अयोध्या दौरा करणार आहेत. मात्र, आता पुन्हा अयोध्या दौऱ्याचा विषय चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्यानं या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.