मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अजित पवार यांच्याकडून घोषणा; महिलांना प्रतिमहिना मिळणार 'एवढे' रुपये
पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली.
ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतील. यासाठी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल.
ई रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात 10 हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी 80 कोटींचा निधी उपलब्ध करणार. सामुदायिक विवाहात 10 हजारांवरून 25 हजार रुपयांपर्यंत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय देखील महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.