Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होताय #SuperfastCM म्हणून ट्रेंड

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विटरवर ट्रेंड
Published by :
Sagar Pradhan
Published on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपूरमध्ये अनेक विकासकामांचे लोकार्पण केले. नागपूरला मुंबईशी जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या महामार्गावरून आता सर्वसामान्यांना सुपरफास्ट प्रवास करता येणार आहे. मात्र, या समृद्धी महामार्गाची प्रचंड चर्चा सुरु आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

Stratus

आज राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस ठरला. कारण नागपूर ते मुंबई 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं. हे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हस्ते करण्यात आले. या लोकार्पण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. हा महामार्ग महाराष्ट्राचा विकासाला आणखी नवी चालना देणार आहे. त्यामुळे या महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्याची प्रचंड चर्चा सुरु आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे #SuperfastCM ट्रेंड करत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com