Babasaheb Purandare | Sharad Pawar
Babasaheb Purandare | Sharad Pawarteam lokshahi

पुरंदरेंएवढा अन्याय छत्रपतींवर कुणीही केला नाही, शरद पवारांनी केलं परखड मत व्यक्त

महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय?
Published by :
Shubham Tate
Published on

Babasaheb Purandare Sharad Pawar : भाजपने एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेऊन मुख्यमंत्रीपद दिलं की डोक्यावर दगड ठेवून मुख्यमंत्रीपद दिलं, हे मला माहिती नाही. हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना यासंदर्भातील वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. मात्र, त्यावर शरद पवार यांनी थोडक्या शब्दांत भाष्य केलं आहे. (Chhatrapati as Babasaheb Purandare, Sharad Pawar expressed his firm opinion)

Babasaheb Purandare | Sharad Pawar
गुलाबराव पाटलांना शिवसेनेकडून झटका, 'ती' रुग्णवाहिका घेतली परत

यावेळी बोलताना ते म्हणाले की, बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं आणि त्यांच्या लिखाणाएवढा अन्याय शिवछत्रपतींवर दुसरा कुणीही केला नाही, तसेच शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेवांचं योगदान काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवचरित्र ग्रंथ प्रकर्षण सोहळा आज पुण्यामध्ये पार पडला यावेळी भाषणात शरद पवार यांनी असं परखड मत व्यक्त केलं आहे. पण श्रीमंत कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. भारतात अनेक राज्यकर्ते झाले. मौर्यांचे राज्य, अशोकाचे राज्य, यादवांचे राज्य... पण शिवाजी महाराजांचे राज्य यापासून वेगळे होते. कारण त्यांच राज्य कधी भोसल्यांचं राज्य झालं नाही ते रयतेचं राज्य म्हणूनच ओळखल गेलं. महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला. ज्यांचा मातीशी संबंध आहे असा. शिवछत्रपतींचा उल्लेख करताना काही जणांनी धर्मांध चित्र रंगवण्याचा, संकुचित चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण श्रीमंत कोकाटेंनी सत्य मांडलं.'

Babasaheb Purandare | Sharad Pawar
चंद्रकांत पाटील म्हणाले मनावर दगड ठेवून शिंदेंना मुख्यमंत्री केलं, शरद पवारांनी लगावला टोला

शरद पवार यांनी नाशिकच्या नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेवरुन उद्धव ठाकरेंवर केलेले आरोप, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यावर भाष्य केलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या पनवेल येथील कार्यक्रमात मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केल्याचं वक्तव्य केलं. यावर पत्रकारांनी शरद पवारांना विचारलं असता त्यांनी अस विधान केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com