मविआ आज आहे, उद्या सांगता येणार नाही; शरद पवारांच्या विधानाचा भुजबळांनी सांगितला अर्थ
मुंबई : मविआ आज आहे, उद्या मात्र सांगता येणार नाही, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. परंतु, या चर्चा फेटाळून लावत राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी विधानाचा नेमका अर्थ सांगितला आहे. शरद पवार फार मोजून मापून बोलतात. या आघाड्या येतात आणि आघडीत बिघाडी देखील होत असतात. याचा अर्थ असा नाही की ही आघाडी तुटणारच, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
संजय राऊत यांनी 15 दिवसांत सरकार पडणार असल्याचा दावा केला असून मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली दिल्लीत सुरु झाल्या असल्याचे म्हंटले आहे. यावर छक्गन भुजबळ म्हणाले की, ते दिल्लीत काम करतात. ते संपादक आहे. त्यांच्याकडे माहिती येते. माझ्याकडे तरी अशी माहिती नाही.
न्यायालयाचा निकाल १६ आमदारांच्या विरोधात जाईल व त्यांची आमदारकी जाईल. एकनाथ शिंदे पदावरून गेले तर दुसरे मुख्यमंत्री होईल. परंतु, निकाल जरी विरोधात आला तरी त्यांच्या सरकारला १६५ आमदारांचा पाठिंबा आहे. १६ गेले तरी १४९ शिल्लक राहतील. मुख्यमंत्री पद जरी गेले तरी सरकार मात्र जाणार नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मविआविषयी भाष्य केले होते. एकत्र लढण्याची इच्छा आहे पण इच्छा पुरेशी नसते कारण जागावाटप त्यातले प्रश्न याबाबत अजून चर्चा झालेली नाही असं महत्त्वाचं विधान शरद पवार यांनी केलं त्यामुळे राज्यातल्या महाविकास आघाडीचं भविष्य सध्या तरी अंधातरी दिसतंय. कोणी फोडण्याचा काम करत असेल तर त्यानी करावं आम्ही आमची भूमिका घ्याची ती घेऊ, असे शरद पवार म्हणाले होते.